आ.राम सातपुतेंना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारच नाही-कांबळे
सोलापूर प्रतिनिधी :विधिमंडळात आपल्या अकलेचे तारे तोडणारे माळसिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राम सातपुते यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देखील घेण्याचा नैतिक अधिकार नाही अशी जळजळीत टिका भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.अधिक बोलताना कांबळे म्हणाले की आ.सातपुतेंनी आपली हयात बहुजन समाजातील तरूणांची माथे भडकविण्यात पटाईत असलेल्या संघटनांचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, आखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषद यात काम करून स्वत ची राजकीय पोळी भाजून घेतली आहे.
त्यावेळेस त्यांना कुठेही दलित असल्याची जाणिव झाली नाही.आताच ते
सनातन हिंदू दलित हा आहेत म्हणून उर बडवून घेत आहेत पण वास्तविक पाहता त्यांच्या सुपिक डोक्यात ही सनातन हिंदू दलित ही संकल्पनाच आली कशी ?
आमदार राम सातपुते गुरूवारी विधानसभेत बोलताना म्हणाले की मी.हिंदू दलित आहे ,सनातन हिंदू दलित आहे माझे वडील माझे वडील जोडे शिवायचे याचा मला अभिमान आहे.मला सनातन धर्माचा अभिमान आहे.पण सातपुतेंना माहित नाही का?की धर्माच्या नावावर हजारो वर्ष प्रस्थापित उच्चवर्णीय लोकांनी बहुजन समाजाला अमानवी जीवन जगण्यास भाग पाडून त्यांचे अतोनात शोषण केलेले आहे .
राम सातपुते सारखे असंख्य लोक सत्तेसाठी मनुवादी विचारसरणीच्या लोकांची लाचारी पत्करतात.
आज जर माळसिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमाती साठी राखीव नसता तर हेच राम सातपुते एखाद्या उच्चवर्णीयांकडे घरगडी म्हणून कामाला असते हे त्यांनी विसरू नये. असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.