पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU पथकाची कारवाई, देहविक्रय करून घेणाऱ्या एक महिला व एक पुरुषला अटक. तीन पीडित महिलांची सुटका*



            *पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU पथकाची कारवाई, देहविक्रय करून घेणाऱ्या एक महिला व एक पुरुषला  अटक. तीन पीडित महिलांची सुटका*


लातूर 
                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 14/07/2023 रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, लातूर शहर परिसरातील एक महिला, व एक पुरुष घरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेत आहे.
                 सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक श्री.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्री.सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनात व  नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक, अंकिता कणसे, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे, मपोउपनि. श्यामल  देशमुख, एएचटीयु, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर  यांचेसह  पथकातील अधिकारी व महिला अमलदार यांचे पथकाने बनावट ग्राहक पाठवून  सदर ठिकाणी छापा मारण्यात आला.
             त्या  ठिकाणी देहविक्रीय करीत असताना 3 पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारी एक महिला व एक पुरुष आढळून आले. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 14,044/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
             तसेच पिडीत महिले कडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारी महीला स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून  वेश्या व्यवसाय करून घेते व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करते असे पीडित महिलांनी सांगितले. 
               सदर प्रकारा बाबत पोलीस पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 523/2023. कलम 370 ,34 भा.द. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959, कलम-3,4,5, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेस अटक करण्यात आली आहे.
                   सदरच्या कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक, श्रीमती. अंकिता कणसे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलिस उप निरीक्षक, श्यामल  देशमुख,पोह.सदानंद योगी, मपोना सुधामती वंगे, लता गिरी,वाहन चालक बुड्डे यांनी केली आहे.
                    गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या