औसा(प्रतिनिधी) येथील ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.वातावरणातील ओझोनच सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो.माणसाने पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी काय केले नाही तर काय होत याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.जागतिक ओझोन दिवसाचे महत्व सांगताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शेख अंजुमनेहा इकबाल यांनी सांगितले की,ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे.कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते.सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.म्हणून ओझोन थराचे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे.तसेच ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो.परंतु आता मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे.जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो.जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर मानवाशिवाय झाडे,प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक परिणाम होऊ शकतो.अशा परिस्थितीत ओझोन थरचे जतन करणे फार महत्वाचे आहे.
त्यानंतर जागतिक ओझोन दिवसाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.शेवटी पर्यावरणाचे रक्षण,प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावणे,ओझोनचे रक्षण व झाडांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी शिक्षका तरन्नूम पटेल,मुस्कान शेख,जरीना पटेल,तहेनियत पठाण,बुशरा पंजेशा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आयेशा सय्यद यांनी केले तर आभार उमर शेख यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.