ऐतिहासिक किल्ला परिसर व तहसील कार्यालयात राबविली स्वच्छता मोहीम
औसा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करावा अशी संकल्पना मांडली होती. त्या अनुषंगाने औसा शहरातील भुईकोट किल्ला परिसर व तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिसरामध्ये आमदार अभिमन्यू पवार, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संतोष मुक्ता, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे ,कंठप्पा मुळे, संचालक प्रवीण कोपरकर, कल्पना डांगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, पत्रकार राम कांबळे, विनायक मोरे, संजय सगरे, किशोर जाधव, एस ए काझी, भाजपा नेते सुनील उटगे ,लहू कांबळे, यांच्यासह शहरातील नागरिक व नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागासह संपूर्ण कर्मचारी वर्गाने जिल्हा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. जिल्हा परिसरामधील काटेरी झुडपे व गवत काढण्याचे काम या स्वच्छता मोहिमेअंतर्गत करण्यात आले तर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील संपूर्ण परिसरामध्ये सेवा पंधरवाडा निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांचे आरोग्य रक्षण करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जिल्हा परिसरामध्ये नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून वर्षभर शहर स्वच्छतेचे काम करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.