लातूर शहरातील स्फोट प्रकरणाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून चौकशी जखमी मुलावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यासंबंधी डॉक्टरांना सूचना भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी

 लातूर शहरातील स्फोट प्रकरणाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून चौकशी


 जखमी मुलावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यासंबंधी डॉक्टरांना सूचना

 भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी






लातूर( प्रतिनिधी): रविवारी सायंकाळी लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात
फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन एक जनाचा मृत्यू तर जवळपास दहा
मुले जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, सदर घटनेची माहिती
मिळाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच  २ खाजगी रुग्णालयातील
डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधून जखमींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली,
त्यांच्यावर आवश्यक ते  उपचार करण्याचा सूचना दिल्या आहेत,

सदरील घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दहा मुले जखमी
झाली आहेत, यातील आठ मुले शासकीय रुग्णालयात तर स्पर्श आणि गॅलक्सी
रुग्णालयात प्रत्येकी एक  मुल  उपचारासाठी दाखल झाले आहे. सदरील घटनेची
माहिती मिळतात आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे शहर
जिल्हाध्यक्ष अध्यक्ष  ऍड किरण जाधव व सहकार्यांना घटनास्थळी तसेच जखमी
लहान मुले उपचारासाठी दाखल झालेल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि  स्पर्श व  गॅलक्सी या खाजगी रुग्णालयात पाठवून, जखमींना
व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत पुरवण्यासंबंधी सांगितले आहे. ॲड
किरण जाधव यांनी तिन्ही  रुग्णालयात जाऊन जखमींची तसेच त्यांच्यावर सुरू
असलेल्या उपचारा संबंधी माहिती घेतली, सदरील माहिती त्यांनी आमदार अमित
विलासराव देशमुख यांना अवगत केले आहे, आमदार देशमुख यांनी हे डॉक्टरांशी
बोलून जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्यासंबंधी सूचना केल्या आहेत
या घटनेनंतर माजी मंत्री आमदार देशमुख यांनी लातूर महापालिका
प्रशासनाशीही संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.
सुरक्षेची काळजी न घेता विनापरवाना  शहरात फिरणाऱ्या विक्रत्यांना
महानगरपालिकेने प्रतिबंध करावा.  यापुढे असे प्रकार घडणार नाहीत या
दृष्टीने काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी लातूर मनपा अधिकाऱ्यांना
दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या