सुरत चेन्नई हायवेभुसंपादन सरळ खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे सादर
खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित नियोजन भवनात शेतकऱ्यांची घेतली बैठक.
उस्मानाबाद- - महाराष्ट्र राज्यातुन जाणाऱ्या सुरत चेन्नई हायवेबाधीत शेतकऱ्यांच्या शेतजमीनींचे भुसंपादन मोबदला राज्यातील समृद्धी महामार्गाप्रमाणेच देण्यात याव्यात अशी ठोस मागणी शासनाकडे करणार असल्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात येथील जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर तालुक्यातील बाधित होणाऱ्या सुरत चेन्नई हायवेबाधीत शेकडो शेतकरयांनी खा. ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित जिल्हा नियोजन भवनात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलतांना ते म्हणाले की, समृद्धी हायवे हा राज्यातील महामार्ग आहे त्याला शासन चालू बाजार भाव मुल्यनुसार थेट खरेदी करत असेल तर सुरत चेन्नई हायवे बाधीत शेतकऱ्यांना समृद्धी हायवेप्रमाणेच मोबदला मिळाला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेतजमिनी या हायवे मुळे बाधित होत असुन ते कायमचेच भुमिहीन होणार आहेत त्यामुळे शासनाने शेतकऱयांना रास्त योग्य बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करणार त्याशिवाय एकही जमीन हायवेसाठी देण्यात येणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी सुरत चेन्नई हायवेचे भुसंपादन सरळ खरेदीने करण्यात यावे, हायवेच्या दोन्ही बाजूंनी ३३ फुटाचा सर्व्हीस रोड देण्यात यावा व ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी शासन निर्णय होईपर्यंत हायवै भुसंपादन व मुल्यांकन अवार्ड स्थगित करण्यात यावे.अशाप्रकारे तिन प्रस्तावाचे ठराव सर्वानुमते मंजूर करून शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे खा. ओमराजे निंबाळकर आ. कैलास पाटील यांनी सांगितले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.