बज्म-ए-गालिब सोलापूर तर्फे उर्दू बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर*

 *बज्म-ए-गालिब सोलापूर तर्फे उर्दू बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर*




सोलापूर-

बज्म-ए-गालिब सोलापूरतर्फे राष्ट्रीय स्तरावरील बाल नाट्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये एकूण 18 राष्ट्रीय स्तरावरील  स्पर्धेत बाल नाट्य लेखकांनीभाग घेतला होता.  या स्पर्धेच्या परीक्षकांची जबाबदारी अनीस आझमी (दिल्ली), अस्लम परवेझ (मुंबई), वकील नजीब (नागपूर) आणि सिराज दुलार (मालीगाव) यांनी या स्पर्धेच्या परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. या परीक्षकांच्या एकमताने निकाल जाहीर करण्यात येत असल्याची माहिती बज्म-ए-गालिब सोलापूरचे सचिव डॉ.हारून रशीद बागबान यांनी दिली.

प्रथम पारितोषिक: 15,000 रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र नाटक "करुणा अदालत में" लेखक, रौनक जमाल, दुर्ग, छत्तीसगड,  द्वितीय पारितोषिक: 10,000 रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र नाटक "वेबगिव्हर, स्व-शोध" लेखक, अदनान सरखोत, मुंबई, तृतीय पारितोषिक: 5000 रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र नाटक 'तमाशा' लेखक, एम. मुबीन, भिवंडी तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक: 5000 रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र नाटक 'छोटे सरकार' नाटककार, शेख हुसेन, औरंगाबाद व शहर शोलापूर विशेष पारितोषिक: 5000 रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र नाटक "वक्त" नाटककार, डॉ. एहतशाम हुसेन नदाफ यांना पारितोषिक जाहीर करण्यात आली आहे. सदर पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी 24 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले.

या नाटकांच्या निकालांबाबत एक स्पष्टीकरण असे की, यापूर्वी परीक्षकांनी रईस सिद्दीकी (भोपाळ) यांच्या ‘इतेबार’ नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर केले होते. पण नंतर हे नाटक स्पर्धेच्या अटींचे उल्लंघन करणारे प्रकाशित नाटक आहे, असे परीक्षकांच्या निदर्शनास आले. सदर बालनाट्य अप्रकाशित असावे, अशी स्पर्धेची अट होती, हे नाटक प्रकाशित झाल्यामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या