एक वर्षा पासून बेपत्ता असलेल्या आणखीन 02 मुलींना शोधण्यात यश. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU ची "ऑपरेशन मुस्कान-12" अंतर्गत कारवाई


*एक वर्षा पासून बेपत्ता असलेल्या आणखीन 02 मुलींना शोधण्यात यश. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU ची "ऑपरेशन मुस्कान-12" अंतर्गत कारवाई.*






  लातूर (प्रतिनिधी )याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सन 2022-23 मध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर, उदगीर ग्रामीण व औसा येथे अल्पवयीन मुलींचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अनुक्रमे तीन अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यापासून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलींचा शोध घेत होते परंतु त्या मिळून येत नव्हत्या.


               तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील हरवलेल्या बालकांच्या संदर्भात व बेपत्ता महिलांच्या शोधाबाबत निर्देश देऊन "ऑपरेशन मुस्कान 12" ही शोध मोहीम दिनांक 01/ 11/2023 ते 30/11/2023 या कालावधीमध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत सर्व पोलीस विभागांना आदेशित केले होते. 

                   त्या वरुन पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले, आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (AHTU) आदेशित करून सूचना व मार्गदर्शन करून "ऑपरेशन मुस्कान -12" राबविण्यास येत आहे .

                  पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत "ऑपरेशन मुस्कान" अंतर्गत वरील गुन्ह्याचा समांतर तपास करून अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून पुणे , सातारा,सोलापूर, व राज्याच्या सीमालगत गावात सदर मुलींचा शोध घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या इसमासह पोलिस ठाणे शिवाजीनगर, उदगीर ग्रामीण  चौक येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

                "ऑपरेशन मुस्कान-12" अंतर्गत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोहेका योगी, मापोना सुदामती वंगे, पोना जाधव ,मपोना लता गिरी,चालक शंकर बुढे तसेच सायबर सेल यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.


*काय आहे "ऑपरेशन मुस्कान-12" ?*


              या मोहिमे अंतर्गत हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून बेपत्ता व्यक्ती त्यांच्या घरच्यांना पुन्हा सूपूर्द केल्या जातात. ऑपरेशन मुस्कान-12 म्हणजे "ज्या घरातून लोक बेपत्ता झाली आहेत. त्या घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आणण्यास मदत करणे." ही मोहीम महाराष्ट्र पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा 2014 मध्ये राबवली होती.

                लातूर पोलीस दलात 1 मार्च 2022 पासून कार्यान्वित झालेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) कडून आज पर्यंत 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या  30 मुलींना शोधून त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सूपूर्द केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या