लातूरात खाजगी बसने दोन मोटारसायकल चालकास चिरडले.
एकास डोक्याला गंभीर मार, रुग्णालयात उपचार सुरु.
लातूर दि 18 मे ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत खाजगी बस चालकाने स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि 18 मे रोजी सकाळी 07 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल चालकास धडक देत खाजगी बसच्या समोरील टायरखाली एका मोटारसायकलला चिरडले तर दुसर्या मोटारसायकलला समोरील बाजूने ठोकरले यात एकास डोकाला गंभीर मार लागला असुन रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामदास पंढरी ताकपडे वय 26 राहणार मोळवण ता अहमदपूर सध्या हरिभाऊ नगर लातूर हे आपली राञपाळीचे काम संपवून डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुध घेण्यासाठी एम एच 24 ए आर 5106 होंडा कंपनिची मोटारसायकल थांबले असताना पुणे- अहमदपूर- लोहा- कंधार जाणारी समोर राजधानी नाव लिहलेली एम एच 04 जी एफ 6669 खाजगी बस दुसर्या खाजगी बसला ओव्हरटेक करत या मोटारसायकल ला धडक देऊन चिरडली तर समोरच चौकात वळण घेऊन बौद्ध नगर येथे वळत असलेले महादेव कांबळे वय अंदाजे 55 हे त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच 24 ए सी 9063 वरुन जात असताना या बसने ठोकरले आहे. यात महादेव कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्थानिकांकडून समजते तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.