औसा शहर तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरळीत व दर्जेरार होत नाही निकृष्ट दर्जा चे काम करू नये :मुख्याधिकारी, नगर परिषद,औसा यांच्या कडे मागणी
औसा (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे की, तिसरा टप्पा नालीचे काम सुरु आहे. सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून नालीचे काम सुरु असताना नाली वळींब्यामध्ये काम केले जात नाही. माघे पुढे केले जात आहे तसेच नालीचे काम लाईन दोरीमध्ये करण्यात यावे. पालीकेने अधिगृहण केलेली जागा पैकी मध्ये बाहेर होत आहे.
तरी नालीचे काम लवकरात लवकर अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे. जेणे करुन तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे अनेक दिवसापासुन मागणी करुन आता यश आले आहे परंतु काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येऊ नये जेणे करुन शहरातील व तालुक्यातील जनतेला चांगला रस्ता होईल अशी चांगले दर्जेदार काम करण्यात यावे व दोन्ही बाजुने नाली सरळ करण्यात यावी. व नालीचे काम तातडीने पावसाळ्यापुर्वी करण्यात यावे.अशी मागणी सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा.यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद,औसा कडे केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.