थकबाकीधारकावर मनपाची धडक कार्यवाही
कार्यवाही करताच ०८ मालमत्ताधारकांनी केला थकीत कराचा भरणा
लातूर/ प्रतिनिधी: मालमत्ता कर हाच लातूर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्या दृष्टीने सालसन २०२३-२४ वर्षात मनपा तर्फे वसुली मोहिम राबविण्यात आली, ज्याअंतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या व वेळोवेळी कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले. त्यास बहुतांश मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देऊन आपल्या कराचा भरणा करून मनपास सहकार्य केले.
परंतु, काही मालमत्ताधारकाकडे कर थकीत आहे. थकबाकिदार यांना थकीत रकमेवर दरमहा व्याज सुद्धा लागत आहे. थकीत मालमत्ताकराचा भरणा करण्याबाबत वेळोवेळी मागणी बीले,नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने क्षेत्रीय कार्यालय ए,बी,सी,डी, अंतर्गत येणा-या कार्यक्षेत्रामध्ये थकित मालमत्ताधाकराच्या वसुलीसाठी दि.१७.०५.२०२४ रोजी एकूण १६ वाणिज्य आस्थापनावर कार्यवाही करण्यात आली.सदर मालमत्तापैकी पेट्रोल पंप कार्यालय, बॅक व्यवस्थापक कार्यालय, लाकडी गोडाऊन तसेच इतर वाणिज्य आस्थापनावर कार्यवाही करताच यामधील ०८ मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा केला आहे.
या पुढेही थकीत कराच्या वसूलीसाठी थकबाकी मालमत्ताधारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असून थकबाकीधारक मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ताकर व पाणी पट्टी कराचा भरणा करून जप्तीसारखी होणारी कठू कार्यवाही टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांनी नागरिकांना केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.