निवडणूक खर्च निरीक्षक यांची आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्टला अचानक भेट

 निवडणूक खर्च निरीक्षक यांची

आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्टला अचानक भेट








 लातूरदि. 05 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी आज रात्री अचानक आंतरराज्य सीमेवरील स्थिर निगराणी पथकांना (चेकपोस्ट) भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, गट विकास अधिकारी संतोष माने यावेळी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक यंत्रणा अधिक सतर्कतेने कार्यरत झाली आहे. रोकड, मद्य किंवा इतर प्रतिबंधित पदार्थ, वस्तूंची वाहतूक होवू नये, यासाठी स्थिर निगराणी पथकावर वाहनांची तपासणी केली जात आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक श्री. बॅनर्जी यांनी तोगरी व तादलापूर येथील स्थिर निगराणी पथकाला भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या