हजरत टीपू सुलतान शहीद दिनानिमित्त फळ वाटप.
औसा प्रतिनिधी
औसा.
शेरे ए हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या शहीद दिनानिमित्त औसा येथील सय्यद मुजफ्फर इनामदार यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
04 मे 1799 या दिवशी शेर ए हिंद हजरत टीपू सुलतान हे इंग्रजांशी लढताना शहीद झाले होते.त्या दिवसाची आठवण म्हणून सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.यावेळी इनामदार यांनी रुग्णालयात मतदारांशी 100 टक्के मतदान करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांना मतदाराचा जो अधिकार दिला आहे त्याचा योग्य वापर करून चांगल्या उमेदवाराला आपले प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत पाठविण्याचे आवाहन केले.
यावेळी रुग्णालयाचे डॉ.सगरे, डॉ.मणियार, डॉ.पाटील यांच्यासह हारुणखान पठाण, इस्माईल बागवान, मौला शेख, अजहर कुरेशी, सय्यद शाहबोद्दीन, रियाज कुरेशी,शफेक बागवान, तसेच पदाधिकारी, रुग्णाचे नातेवाईक,इतर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.