वृध्द महिलेवर बलात्कार करून हात्या करणार्या नराधमास तात्काळ चौकशी करून फाशी द्यावी यासाठी भादा येथे रास्ता रोको व निषेध मोर्चा.
.
शेख बी जी
औसा:दि .29 भेटा येथील ज्येष्ठ नागरिक महिलेवर झालेला मानवतेचा खून आणि किळसवाणा अत्याचार या घटनेच्या निषेधार्थ 'न भूतो न भविष्यती' अशा स्वयंप्रेरणेने आणि नागरिकांच्या मानवतावादी भावनेने दिवसभरासाठी भादा येथील सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले होते. अत्याचारग्रस्त महिलेला प्रशासनाकडून लवकरच न्याय मिळावा याकरिता भादेकर तरुणांनी असा हा गाव बंदचा यशस्वी टप्पा सहजरीत्या सर्वांच्या संमतीने पार केल्याने तालुक्यात पाहता या संवेदनशील गावाची चर्चा सुरू होती.
भेटा येथे जेष्ठ महिला नागरिक यांच्यावर बलात्कार करून फास देऊन हात्या केल्यानंतर सतत तीन दिवस मृतदेहावर बलात्कार करण्यात आलेल्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून दोषीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा या मागणीसाठी भादा गाव गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवसासाठी सकाळी काहीवेळ रास्ता रोको करन्यात आला .दिवसभर कोणतेही, दुकान पानपट्टी किंवा कोणतेही व्यवहार चौकामध्ये दिवसभरासाठी बंद करण्यात येऊन हा एक दिवशीय बंद कडकडीत पाळण्यात आला. या बंदसाठी भादा पोलीस यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हा बंद सकाळी तरुणांनी गावामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये दवंडी द्वारे नागरिकांना गाव बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.त्यानंतर सकाळी आठ वाजले पासूनच गावामध्ये फिरून हा बंद यशस्वी करण्यासाठी आणि घडलेल्या घटनेचा निषेध व सदरील गुन्हेगारास कडक शासन आणि फासी, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून,sit मार्फत चौकशी,व्हावी याकरिता भादा येथील छत्रपती शिवाजीनगर ते आनंद नगर येथे एकत्रित येऊन चौकामध्ये काही वेळ रस्ता रोको करून दिवसभरासाठी गाव बंद ठेवण्यासाठी भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी हा बंद यशस्वी करण्यासाठी नियोजन आणि सहभाग याकरिता भादेकर तरुण सर्वश्री उपसरपंच बालाजी शिंदे, सचिन शिवलकर,सोमनाथ बनसोडे, सचिन मुकडे,अनिल गायकवाड,जग्गू माळी,गोरख बनसोडे,गोविंद पाटील,श्रीपाद शिंदे,अमोल पाटील,योगेश लतुरे,महेश गायकवाड,रेवन गायकवाड,संजय बनसोडे,मोहन बनसोडे,दत्ता डोलारे,सुनील माळी,हनुमंत साबळे
दीपक शिंदे,मोहन गायकवाड,सचिन दूधभाते आदी तरुणांसह इतर तरुणांनी प्रयत्न करून हा एक दिवशीय कडकडीत बंद शांततेत यशस्वी केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.