मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा.
औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
शेख बी जी
औसा.दि.३० मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मागील आठ महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखदार कार्यक्रम घेऊन देशाचे पंतप्रधान यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पण महाराष्ट्राचे आरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, तसेच औसा शहर व तालुक्यातील अल्पसंख्यक समाजही दुखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलेले आहे. त्यांनी बांधलेले शेकडो वर्षापुर्वीचे गडकिल्ले, पुल हे आज सुध्दा सुयोग्य स्थितीमध्ये आहेत. परंतू आठ महिन्यापूवी उद्घाटन केलेल्या आमच्या राजाच्या पुतळा शासन व गुत्तेदारांच्या भ्रष्ट कारभारामुळे ते निकृष्ट दर्जाचे कामामुळे पुतळा पडून महाराजांचा अवमान झालेला आहे. सदर घटना ही अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे आपणास औसा तालुका अल्पसंख्यक काँग्रेस च्या वतीने निवेदन सादर करून हि घटना ज्या भ्रष्ट लोर्कामुळे घडली त्यांच्यावर त्वरित कठोर कार्यवाही करावी तसेच त्या ठिकाणी लवकरात लवकर भव्य दिव्य पुतळा उभा करून राज्यातील शिवप्रेमींचा रोष कमी करावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
निवेदनावर औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या व अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.