पालिकेला दिसेना भर रस्त्यावरील कचर्याचे ढिग.
दुर्गंधीयुक्त वातावरणाचा आरोग्यास धोका.
शेख बी जी.
औसा.दि. ३१ शहरातील हद्द वाढीच्या भागात पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे चोहीकडे कचऱ्याचे ढीग व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतेचा संदेश देणारी पालिका शहरात कचरा गाडी फिरवत असली तरी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसाळा असल्याने या कचर्यामुळे दुर्गंध पसरली असून याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने दवाखाने खचाखच भरलेले दिसुन येते आहेत.
नालीसफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या तुंबून गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. मजबूत रस्ते नसल्याने अनेकांना पायी चालताना चिखलातून वाट काढावी लागत आहे.
सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक होत चालली आहे.यांना रस्त्यातून जाताना रस्त्याच्या कडेला मेलेली कुत्रे,मांजरे यांचा वास घेत आपले सकाळचे फिरणे करावे लागत आहे.
या दुर्गंधीमुळे तब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे.
पालिकेत कोणाची सत्ता नसल्यामुळे
मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा जनतेत आहे. या आधीच्या नेत्यांना अशी तक्रार केली तर आम्ही काय करावे? संबंधित कर्मचाऱ्याला सांगितल्यास कर्मचारी काम करत नसल्याचे सांगत आहेत.
स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त पालिकेला ही मरगळ कोणत्या कारणामुळे आली याचा अभ्यास करून तात्काळ जनतेच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जाव्यात व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.