कोवीड१९ चे संकट अदयाप टळलेले नाही
आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जावी
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या
सोलापुर येथील आढावा बैठकीत सुचना
सोलापूर, दि. 14:
सोलापूर शहरातील कोविड१९ चे संकट टळलेले नाही त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे असल्याच्या सुचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रवीवारी येथे दिल्या आहेत. कोविड१९ विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्याधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीस आमदार प्रणितीताई शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त् जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस उपायुक्त् वैशाली कडूकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री देशमुख यांनी सांगितले की, सोलापुरातील कोरोना प्रसार शहराच्या ठराविक भागात आहे. त्या भागात आणि मुंबईच्या धारावी परिसरात काही अंशी साम्य् आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या त्याचा अभ्यास करुन त्याप्रमाणे उपाययोजना सोलापुरात राबवाव्यात.
प्रसार वाढणार नाही यासाठी फिल्डवर आणि बाधित व्यक्तींवर रुग्णालयात उपचार अशा दोन आघाडयांवर कोविड-19 विरुध्दची लढाई लढायची आहे. शहरात आणि ग्रामीण भागात दर पंधरा दिवसांनी तपासणी करायला हवी. विशेष करून वयस्कर आणि मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग अशा आजार असणा-या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवायला हवे, असे त्यांनी सांगितले. सोलापूरसाठी तज्ञ डॉक्टरांचे एक पथक पाठविण्याचा विचार केला जाईल. खासगी दवाखान्यात कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांना शासकीय दरानूसार पैसे आकारले जावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न् करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूरसाठी स्वतंत्र पथकांची मागणी केली होती.
आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या उपचारासाठी स्वतंत्र उपाययोजना करायला हव्यात असे सांगितले.
सिव्हील हॉस्पिटलमधील बी ब्लॉकमध्ये पहिल्या मजल्यावर कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. यावर विचार केला जाईल, असे श्री देशमुख यांनी सांगितले.
या वेळी वैश्ंपायन स्मृती माहाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य् अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, महापालिकेच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.