शेतकर्‍याना एकरी 25 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची जिल्हाधिर्‍यांकडे मागणी





शेतकर्‍याना एकरी 25 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची जिल्हाधिर्‍यांकडे मागणी
लातूर दि.26/06/2020
कोरोना व्हायरसमुळे जगासह भारतातील सर्वच क्षेत्रावर मोठे संकट आलेले आहे. यामुळे शेतकरी लहान व्यापारी, कामगार, महिला उद्योग अडचणीत आलेले आहेत. त्यातच खरीपाची पेरणी केलेल्या बळीराजाच्या सोयाबीन पिकाची उगवणच झाली नसल्यामुळे शेतकर्‍यावंर दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करुन बोगस बियाने देणार्‍या कपंन्यावर गुन्हे दाखल करुन शेतकर्‍याला एकरी25 हजराची मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना देण्यात आले.
महाराष्ट्रामध्ये यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे बहुतांश पेरण्या पुर्ण झालेल्या आहेत. परंतु पेरणीसाठी वापरण्यात आलेले बियाणे महामंडळ व इतर नामांकित कंपन्याचे बियाणे वापले नसल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसलेला आहे. दरम्यान लातूर तालुक्यातील सारसा, वांजरखेडा येथील पिकांची पाहणी केली असता, शेतकर्‍यांनी पिकाबाबतच्या तक्रारी मांडलेल्या आहेत. त्यामुळे या पिकाचे तात्काळ पंचनामे करुन तसेच बोगस बियाणे  देणार्‍या कंपन्यावर  गुन्हे दाखल करुन  शेतकर्‍यांना एकरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.



राज्यामध्ये भिषण परिस्थिती असतानाही सरकारने कांहीही मदत केलेली नाही. देशातील तेलंगणा व इतर राज्याने शेतकर्‍याला एकरी दहा हजार रुपये व कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रत्येक कुटूंबाला नगदी मदत केली. त्यामुळे त्याचधर्तीवर महाराष्ट्र राज्यातही त्त्वरीत मदत द्यावी. केंद्र शासनाने देशातील सर्व घटकांना 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज. दिले आहे. यामुळे शेतकरी, कामगार, लहान उद्योगांना मोठी मदत झालेली आहे. परंतु त्याचधर्तीवर शेतकरी व सामान्य नागरिकांना नगदी स्वरुपात मदत देण्यात यावी, अशी मागणीही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
शेतकरी व कोरोनाच्या परिस्थितीवर पालकमंत्र्याशी चर्चा
जगासह देशावर कोरोनाचे मोठे संकट आलेले आहे. या विषयांबाबत ठोस अशी लस निघाली नसल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे देश चिंतेत आहे. त्यातच राज्यामध्ये खरपाची पेरणी झाली, परंतु  शेतकर्‍यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाने उगवले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हे वास्तव चित्र आहे. याबाबत समस्यांचे निराकारण करण्यासाठी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी गेले असता लातूरचे पालकमंत्री आ.अमीत विलासराव देशमुख यांची भेट झाली. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये कोरोना व जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीविषयक परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख यांनी माजी आ.कव्हेकर यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची दखल घेवून शेतकर्‍यांचे नुकसानीचे तात्त्काळ पंचनामे करावेत. अशा सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदतीबाबतही सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन विरोधी पक्षातील नेत्यातही जिल्ह्यातील विविध प्रश्‍नावर चर्चा झाली. जिल्ह्यातील विकासाबाबत नेत्यांमध्ये एक वाक्यता असल्याचे दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या