भारतीय जवानांवर हल्‍ला करणार्‍या चीनचा निषेध करून शहीदांना श्रध्दांजली







भारतीय जवानांवर हल्‍ला करणार्‍या चीनचा निषेध करून शहीदांना श्रध्दांजली.
भाजपा शहर युवा मोर्चाचा पुढाकार ःचिनी वस्तूचा वापर टाळून स्वदेशीचा वापर करण्याचे  कव्हेकर्‍यांचे अवाहन
लातूर दि.18-06-2020
भारत-चीन सिमेवरून चीनने भारतीय जवानांवर हल्‍ला केला असून यामध्ये एका अधिकार्‍यासह 20 जवान शहीद झाले. यामुळे भारत चीन या दोन देशामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही वास्तव परिस्थिती लक्षात घेवून चीनने भारतीय जवानांवर हल्‍ला केल्याच्या निषेधार्थ लातूर शहर भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने शहरातील महात्मा बसवेश्‍वर चौकात 10.30 वा. भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली चीनच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून वचीनच्या राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळून निषेध व्यक्‍त केला.
यावेळी बोेलताना भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, सध्या आपण बर्‍याच चीनी वस्तूचा वापर करीत आहोत. चीनच्या या कृतीमुळे भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. त्यामुळे आपण वापरत असलेल्या चीनी वस्तूचा वापर टाळून स्वदेशीचा वापर करावा, तरच ती शहीद झालेल्या भारतीय जवानांना खरी श्रध्दांजली ठरेल.
यावेळी संजय गिर, ओम खुब्बा,गणेश गवारे, अमोल गिते,अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे,संजय कदम, संतोष जाधव, अ‍ॅड.पंकज देशपांडे, शिवाजी कामले, अमर पाटील, उत्‍तम सुर्यवंशी, कैलास अंबेगावे, शाम पवार,  आकाश बजाज, अक्षय स्वामी, तुकाराम घायाळ, अ‍ॅड.पंकज देशपांडे, अजय कोटलवार, अमोल हांडे, काशिनाथ कागले,शशिकांत हांडे, सतिष माने, महादेव पिटले, सौ.आफरीन खान, अब्दुलभाई, दत्ता बोरूळे, महेश बरगले, लताताई घायाळ, अक्षय बजाज, उमेश इरपे, राजेश पवार, जावेद शेख, बालाजी खमामे, अक्षय सगर यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. आंदोलनाच्या प्रारंभी चीनचे राष्ट्राध्यक्ष चिनपिंग यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्‍त करण्यात आला.
चीनी वस्तूचा वापर टाळून स्वदेशीचा वापर वाढवावा
सध्या टिक-टॉक व पब्जीच्या माध्यमातून चीन मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहे. दोन्ही देशाच्या ट्रेडमध्ये 92 अब्ज डॉलरचे ट्रेड आहे, यातून भारताला 56 अब्ज डॉलरची ट्रेड डेफिशेट पडत आहेत. यातून चीनची मोठी कमाई होत आहे. हा व्यवहार एकतर्फी होत आहे. तरीही या देशाकडून आपणांस अशी वागणूक मिळत आहे. त्यामुळे चीनचा जाहीर निषेध करून मार्केटमध्ये खरेदी करताना चीनी वस्तू टाळून स्वदेशी वस्तूचा वापर वाढवावा, असे आवाहनही अजित पाटील कव्हेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या