सहकाऱ्यांच्या मदतीमुळेच कोरोना रोखण्यात यशस्वी - तहसीलदार स्वप्निल पवार





सहकाऱ्यांच्या मदतीमुळेच कोरोना रोखण्यात यशस्वी - तहसीलदार स्वप्निल पवार

लातूर: कोरोना महामारीचा सामना करत असताना तहसीलदार म्हणून जे जे निर्णय घेतले ते वरिष्ठामुळे. पालकमंत्री नामदार अमित देशमुख,जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आदेश व माझे सर्व नायब तहसीलदार व कर्मचारी यांच्यामुळेच कोरोनासारख्या महामारीवर यश मिळवता आले असे गौरवोद्गार लातूर तहसीलदार स्वप्निल पवार यांनी व्यक्त केले.
     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून तहसीलदार स्वप्निल पवार यांचा सन्मान लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे  यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व गौरव पत्र देऊन करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांनी आपल्या वरिष्ठांचे आदेश व सर्व सहकार्यामुळेच हे यश मिळवता आले असे ते म्हणाले. या सन्मान सोहळ्यास तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,नायब तहसीलदार सुधीर देशमुख,एस.एस.उगले, रत्नाकर महामुनी,आंब्रे पाटील,संजय जाधव,महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पांचाळ, स्वस्त धान्य दुकान असो.विभागीय अध्यक्ष हंसराज जाधव,आधीच कर्मचारी बांधव उपस्थित होते.
      सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक देडे,कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे,जिल्हा संघटक महादेव डोंबे,जिल्हा सरचिटणीस अशोक हनवते,कोषाध्यक्ष अरुण कांबळे, बालाजी फड, विनोद चव्हाण, नितीन भाले,हरून मोमीन,कलीम शेख,इस्माईल शेख,अमोल घायाळ तसेच जिल्हा पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार रविकिरण गिरी,आसिफ पटेल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल शेख यांनी तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अशोक देडे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सरचिटणीस अशोक हनवते यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या