रोटरी क्लबऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने पत्रकारांना आयुर्वेदिक जी.एल.निलावार काढ़याचे वाटप
----------------------------------------
सध्या जगात सर्वत्र उजतखऊ-१९ या कोरोणा विषाणु संसर्गाने थैमान घातलेले आहे, सर्वत्र चिंताजनक परिस्थिति उद्भवलेली आहे तरीही पत्रकार (कोरोना योद्धे) न थकता आपली जबाबदारी अगदी योग्य रित्या पार पाडत आहेत, दिवसेना दिवस लातुरातील कोरोना रोगाची लागण वाढताना दिसत आहे. अशावेळी या कोरोना योद्ध्यांची म्हणजेच पत्रकाराची प्रतिकारक्षमता अतिशय उत्तम असणे गरजेचे आहे, असे मत रोटरी क्लबऑफ लातूर मिडटाऊनचे ओम मोतीपवळे यांनी व्यक्त केले.
लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिह घोणे या वेळी बोलतांना म्हणाले की लातूर येथील जेष्ठ आयुर्वेद तज्ञ वैद्य दत्तात्रय दगडगावे यांनी त्यांच्या ज्ञानाची व अनुभवाची जोड घालून निर्माण केलेल्या व्याधी प्रतिबंधात्मक अश्या जी एल निलावार काढ्याचे निशुल्क वाटप करण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कोरोनाच्या महामारीत पत्रकार जीवांची पर्वा नकरता काम करत आहेत. त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोटरी क्लबऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने पत्रकारांना आयुर्वेदिक जी.एल.निलावार कड्याचे वाटप केल्याने आता पत्रकाराचा कोरोनापासून बचाव होणार होणार असल्याचे सांगितले.यावेळी आवश्यक त्या प्रमाणात ह्या काढ्याच्या पाऊचचे हस्तांतरण लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिह घोणे यांच्याकडे केले आहे
यावेळी वैद्य दत्तात्रय दगडगावे यांनी या काढ्याच्या सेवनाच्या शास्त्रोक्त विधी सन्दर्भात योग्य असे मार्गदर्शनही केले तसेच या काढ्याच्या सेवनाने अनेक रुग्णांमध्ये प्रतिकारक्षमता वाढलेली आढळून आल्याचे आणि ही आयुर्वेदिक औषधी शास्त्रोक्त पद्धतीने आयुष मंत्रालयाच्या निर्देशाचे अनुकरण करुन तयार करण्यात आली असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी रोटरी क्लबऑफ लातूर मिडटाऊनचे ओम मोतीपवले,अध्यक्ष रो शशिकांत मोरलवार,सचिव रो विरेंद्र पुंडीपल्ले,सचिव कपिल पोकर्णा,रो रवींद्र बनकर तर लातूर जिल्हा पत्रकार संघाचे पदाधीकारी व पत्रकार मोट्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.