कंटेनमेंट झोनमधील गर्भवती मातेने दिला सुदृढ कन्येस जन्म
महापौर, उपमहापौर यांच्या वतीने चांदीची पैंजण भेट देऊन अभिनंदन.
लातूर शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आसपासचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणजेच बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो, त्या क्षेत्रातील नागरिकांना १४ दिवस कंटेनमेंट झोन बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. दरम्यानच्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आपल्या आवश्यक वस्तूंचा घरबसल्या पुरवठा केला जातो उपलब्ध करून दिल्या जातात तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते.
शहरातील खाडगाव रोड येथील बाबा नगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने सदरचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आलेला होता. परंतु याच भागात राहणाऱ्या पूजा शिधापा धोत्रे या गर्भवती मातेस प्रसूतिवेदना जाणवू लागताच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता या गर्भवतीने मातेने सुदृढ कन्येस जन्म दिला. माता व कन्या दोघांचेही आरोग्य उत्तम असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह नगरसेवक आयुब मणीयार, रघुनाथ मदने यांनी धोत्रे कुटुंबियांची भेट घेऊन नवजात कन्येस चांदीची पैंजण व मातेस पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक उपाययोजना राबवित असताना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने धोत्रे कुटुंबीयांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवेबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.