आर्षयोग प्रतिष्ठाण तर्फे जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.19-06-2020
भारतीय महर्षी पतंजलि यांच्या तपश्चर्येतून अद्भूत विद्या योगाची निर्मिती झाली. त्यातून योगा, प्राणायाम, ध्यान समाधी व परमेश्वर साधनेची तेजस्वी शक्ती मिळावी. यासाठी महर्षी पतंजलीने जीवन समर्पीत केले.या विद्येचा प्रसार जगभर करण्यांसाठी राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंदजी, योगगुरू रामदेव बाबा, राष्ट्रीय आर्यवीर दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.देवव्रत्तजी आचार्य यांच्यासारख्या तपस्वीने जगभर व देशात योग प्रसार करण्याचे कार्य केले. जगाच्या युनोमध्ये मान्यता मिळवून देण्याचे कार्य देशाचे पंतप्रधान, योगअभ्यासक मा.नरेंद्रजी मोदी यांनी केले. त्यामुळे जागतील 150 पेक्षा अधिक देशानी योग साधनेला स्वीकारले. व युनोने मान्यता दिली आहे. हा संपुर्ण भारतीयांचा गौरव आहे. युनोने 21 जून हा योग दिवस म्हणून जगासाठी दिला आहे. हा योग दिवस लातूर जिल्ह्यामध्ये योगाचा प्रसार करणार्या आर्षयोग प्रतिष्ठाणतर्फे विवेकानंदपुरम् कळंब रोड येथील स्वामी विवेकांनद सभागृहात सकाळी 8.30 ते 9.30 पर्यंत महाराष्ट्र पतंजलिचे प्रमुख योगप्रसारक विष्णुदास भूतडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी, योग अभ्यासकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन योग अभ्यासक व आर्षयोग प्रतिष्ठाण,लातूरचे अध्यक्ष, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.