कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर शहरातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटपास प्रारंभ करण्यात आला.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेत. आजतागायत कोरोना विषाणू वर लस उपलब्ध झालेली नाही परंतु आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांमुळे मानवी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढत असल्याचे प्रमाणित केले आहे. नुकताच महाराष्ट्र शासनानेही अशा गोळ्यांच्या वापरास मान्यता दिलेली आहे. लातूरचे ख्यातनाम होमिओपॅथिक वैद्यकीय तज्ञ डॉ रविराज पोरे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या लातूर शहरातील कोरोना बाधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना घरोघर वाटप करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कोरोना विषाणूची लागण होण्यापासून काही अंशी बचाव होण्यास मदत होणार आहे.
कंटेनमेंट झोन मधील नागरिकांसह मनपा अधिकारी, कर्मचारी यांनीही आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोळ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ रविराज पोरे यांचे मनपाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
आज प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत या गोळ्या मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या असून मनपा आरोग्य विभागाच्या वतीने बाधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना याचे वितरण केले जात आहे. याप्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, पप्पू देशमुख, उपायुक्त हर्षल गायकवाड, सुंदर बोंदर, आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत माले यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.