केंद्र सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त कार्याचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विकासाचा आढावा आणि भविष्याची दिशा यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाली असून, केंद्रात भाजपा सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या एक वर्षाचा सफल कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी आज लातूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली. या वर्षात देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी कामगिरी केंद्र शासनाने केलेली आहे. यात ३७० कलम हटवणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तिहेरी तलाक या महत्वपूर्ण निर्णयासह राम मंदिर बांधकाम सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच कोरोना महामारी सारख्या वैश्विक संकटास मात देत घेतलेले निर्णय संपूर्ण जगात प्रभावशाली ठरलेले आहेत. आणि या संकटकाळात केंद्र शासनाने कुठलाही दुजाभाव न करता प्रत्येक राज्यास भरीव मदत केलेली आहे. हे केंद्र सरकार लोकहितासाठी व समाजातील प्रत्येक घटकासाठी चांगले काम करण्यास बांधील असून आगामी काळातही अशाच पद्धतीचे काम होईल व आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून समाजहिताचे काम करत आहोत हे आमचे भाग्य असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.श्री.रामेशअप्पा कराड, खा.श्री. सुधाकर शृंगारे, आ.श्री. अभिमयू पवार, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथ मगे व जि.प.अध्यक्ष श्री.राहुल केंद्रे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.