महापालिका कर्मचार्यांना भाजपाच्या वतीने होमियोपॅथिक औषधांचं वाटप
लातूर सुरक्षीत ठेवण्यासाठी भाजपा कटिबद्ध आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर - भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयुष मंत्रालयाने प्रामाणित केलेल्या अर्सेनिक अल्बम - ३० या औषधांचे महापालिका कर्मचार्यांना मोफत वितरण करण्यात आले.
हे वितरण मा. आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर, मा. खा. सुधाकरराव शृंगारे, मा. आ. अभिमन्यूजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थीत पाहुण्यांचे महर्षी धन्वंतरींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मनपातील भाजपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले. तर डॉ. रवी पोरे यांनी ही औषधं उपलब्ध करुन दिली.
यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील म्हणाले की, लातूर शहरातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललीय. यासाठी भाजपा लातूरकरांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी कटिबद्ध राहील. कुठल्याही आर्थिक नुकसानीचा अधिक विचार न करता, रतन टाटा म्हणाल्याप्रमाणे २०२१ ला आपल्या खर्चाच्या कागदावर आपली सही असणं. हे महत्वाचं.
याप्रसंगी खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांची समयोचित भाषणे झाली.
तर शैलेश गोजमगुंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन सांगितले.
या कार्यक्रमास अॅड. दिपक मठपती, अजीत पाटील कव्हेकर, अॅड. ललित तोष्णिवाल, सुनील मलवाड, श्वेता लोंढे, समिना शेख, स्वाती घोरपडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.