मुरुड शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे आ.रमेशअप्पा कराड, खा.शृंगारे यांच्या हस्ते उद्घाटन





मुरुड शहर भाजपा संपर्क कार्यालयाचे आ.रमेशअप्पा कराड, खा.शृंगारे यांच्या हस्ते उद्घाटन

 

        लातूर तालुक्यातील मुरुड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड आणि जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत नागटिळक, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, लातूर कृऊबा संचालक गोविंद नरहरे, मुरुड शहराध्यक्ष वैभव सापसोड, अंनत कणसे, अमर नाडे, सुरज शिंदे, शामसुंदर वाघमारे, बाबा कुंभार, आकाश सापसोड, दत्ता पुदाले, रशिद पठाण, लता भोसले यांच्यासह मुरुड येथील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या