मनमोहक रांगोळीतून 'माय लाईफ माय योगाचा' संदेश.
आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्पर्धेत लाहोटी स्कूलच्या साडेसातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
लातूर,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्रसरकारने देशभर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशातील शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून शाळेत आयोजित न करता आल्याने लातूर शहरातील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीने योगाचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने शहरातील मुख्य चौकांमध्ये अतिशय सुबक व मनमोहक रांगोळी काढून 'माय लाईफ माय योगा' हा संदेश देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या सुंदर व आकर्षक रांगोळीनी लातूरकरांचे लक्ष मात्र चांगलेच वेधून घेतले.
राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये गेली सहा वर्षापासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून स्कूलमध्ये दरवर्षी एक महिना योग शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरातून विद्यार्थ्यांना प्राणायम, योगासन व सूर्यनमस्कार शिकवले जाते. परंतु यंदा कोरोनाच्या साथ रोगामुळे शाळा बंद असल्याने स्कूलने योग विषयक जनजागृती करण्यासाठी मुख्य चौकांमध्ये रांगोळीतून जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
रविवारी पहाटे साडेचार ते सहा वाजेच्या दरम्यान शहरातील मुख्य चौकांमध्ये रांगोळी काढण्यात आली. रांगोळीतून 'माय लाईफ माय योगा', 'सदृढ भारतासाठी सुदृढ शरीर' हा संदेश देत 'रोगमुक्त जीने की चाहत, नियमित योग करने की डालो आदत' अशी कोरोना विषयक जनजागृती देखील केली. रांगोळीतून जनजागृती या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
दरम्यान, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त 'माय लाईफ माय योगा' व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नुसार विद्यार्थ्यांनी घरी बसून योगासन व प्राणायम करत असल्याचे व्हिडीओ व फोटो आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राजा नारायणलाल लाहोटी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत स्कूलच्या साडेसातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर फोटो, व्हिडिओ अपलोड करून सहभाग नोंदवला.
स्कूलच्या वतीने रांगोळी काढण्यासाठी चित्रकला शिक्षक हणमंत थडकर व माधव जोशी यांनी सुंदर रांगोळी काढली. तर या उपक्रमासाठी स्कुलचे रजिस्ट्रार प्रवीण शिवणगीकर, कॅप्टन बी के भालेराव, प्रकाश जकोटिया, आशिद बनसोडे, ज्ञानेश्वर गोसावी, पद्माकर दळवी, विनोद चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव आशिष बाजपेयी, स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल एस ए वरदन आदींनी कौ तूक केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.