*नगर पालिका हद्दीतील मालमत्ता कर, नळ पट्टी व दुकान भाडे माफ करण्याची सर्व पक्षीय सामाजिक संघटनेची मागणी*
*(मोईज़ सितारी)*
निलंगा:संपूर्ण देशात कोरोना विषाणू महामारीच्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉक डाउन करण्यात आला होता त्यामुळे अनेक महिन्यापासून सर्व जनतेची हाल झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर निलंगा शहरातील नागरिक व्यापारी अडचणीत आला आहे गोर गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे म्हणून ज्या पद्धतीने लातूर महानगरपालिकेने सर्व दुकान भाडे,नळपट्टी व इतर सर्व मालमत्ता कर माफ केले आहे त्याच पद्धतीने निलंगा नगर पालिका हद्दीतील नळपट्टी,मालमत्ता कर व सदरील दुकानाचे चालू वर्षाचे दुकान भाडे माफ करून सर्व जनतेला व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे
यावेळी काँग्रेस नेते अभय साळुंके, किसान काँग्रेसचे मराठवाडा महासचिव गोविंद शिंगाडे,इस्माईल लादाफ रा काँ शहराध्यक्ष, मुजीब सौदागर जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान संघटना ,अजगर अन्सारी विधानसभा अध्यक्ष काँग्रेस, सुधाकर पाटील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष,उमेश सातपुते युवा सेना उपजिल्हाप्रमुख, गणी खडके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष,शकील पटेल माजी सरपंच दपका,अजित निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस,गोविंद सुर्यवंशी,मुश्ताक बागवान, मुजमिल कादरी,गिरीष पात्रे,सिद्धेश्वर बिराजदार, गफ्फार लालटेकडे,विजय होगले आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.