तक्रारी कृषी विभागाकडे तात्काळ द्याव्यात*
*-पालकमंत्री अमित देशमुख*
*अंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध झाल्या पाहिजेत*
*बॅडमिंटन, कुस्ती व हॉलीबॉल क्रीडा प्रकाराची प्रबोधनी लातूरमध्ये करण्याचा प्रस्ताव सादर करावा*
*महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाथरवाडी शिवारातील जमिनीची उपलब्धता करावी*
*राजीव गांधी चौक ते गरुड चौक दरम्यान च्या राष्ट्रीय महामार्ग पिलर पद्धतीने करावा*
*शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीच्या पावत्या सोबत ठेवाव्यात*
लातूर, दि.23(जिमाका):- या वर्षीचा पाऊस जिल्ह्यात वेळेवर सुरू झाला व पावसाचे प्रमाण हे समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यास सुरुवात केली होती. परंतु जिल्ह्यात आबेक ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात क्रीडा महापालिका वीज वितरण कंपनी राष्ट्रीय महामार्ग व कृषी विभागाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, कृषी विभागाचे सहसंचालक अशोक जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. टेकन, श्री मोईज शेख, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता रवींद्र नळगीरकर, महाबीज कंपनीचे प्रतिनिधी आदीसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे न उगवण बाबतच्या
तक्रारी कृषी विभागाकडे तात्काळ द्याव्यात*
*-पालकमंत्री अमित देशमुख*
*अंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध झाल्या पाहिजेत*
*बॅडमिंटन, कुस्ती व हॉलीबॉल क्रीडा प्रकाराची प्रबोधनी लातूरमध्ये करण्याचा प्रस्ताव सादर करावा*
*महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाथरवाडी शिवारातील जमिनीची उपलब्धता करावी*
*राजीव गांधी चौक ते गरुड चौक दरम्यान च्या राष्ट्रीय महामार्ग पिलर पद्धतीने करावा*
*शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीच्या पावत्या सोबत ठेवाव्यात*
लातूर, दि.23(जिमाका):- या वर्षीचा पाऊस जिल्ह्यात वेळेवर सुरू झाला व पावसाचे प्रमाण हे समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यास सुरुवात केली होती. परंतु जिल्ह्यात आबेक ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात क्रीडा महापालिका वीज वितरण कंपनी राष्ट्रीय महामार्ग व कृषी विभागाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, कृषी विभागाचे सहसंचालक अशोक जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. टेकन, श्री मोईज शेख, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता रवींद्र नळगीरकर, महाबीज कंपनीचे प्रतिनिधी आदीसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
[23/06, 6:54 PM] My Number: पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे व या वर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही वेळेवर केल्या आहेत परंतु जिल्ह्याच्या अनेक भागातून सोयाबीनचे बियाणे उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत तरी यामध्ये कृषी विभागाने लक्ष घालून सोयाबीन उगवण न झालेल्या बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकाराव्यात असे त्यांनी सूचित केले.
तसेच सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केल्याची पावती सोबत ठेवून कृषी सहाय्यक, तलाठी व संबंधित तालुका कृषी अधिकारी यापैकी कोणाकडे ही तक्रार करावी. त्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे बदलून देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच त्याबाबत कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी कृषी विभागाला दिल्या.
लातूर जिल्ह्यातील किडा प्रेमींच्या मागणीनुसार क्रीडा विभागाने जिल्ह्यात विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. लातूर येथे बॅडमिंटन, कुस्ती व हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांची प्रबोधनी व्हावी याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत; त्यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात तालुका क्रीडा संकुले उभी राहावीत यासाठी क्रीडा विभागाने पाठपुरावा करावा. ज्या ठिकाणी क्रीडांगणासाठी जमीन उपलब्ध नाही त्याठिकाणी महसूल विभाग व शासनाकडून जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व तालुका क्रीडा संकुले व विभागीय क्रीडा संकुलाची जागा निश्चित करून या संकुलांची कामे एका वेळ मर्यादेत पूर्ण करून जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडांगणे उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.
महापालिकेच्या 5 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महसूल विभागाने पाथरवाडी शिवारातील पंचवीस एकर जागा उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महापालिकेचा विजे वरचा 50% खर्च कमी होणार आहे त्यामुळे तो निधी लातूर शहराच्या विकास कामासाठी वापरला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेअंतर्गत चे 1.5 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सर्व अडचणींची सोडवणूक करून तात्काळ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
[राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या अनेक भागातून गेलेले आहे त्या महामार्गावरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे एच टी लाईन गेलेली आहे. तरी वीज वितरण कंपनीने महामार्गावरील त्या एच टी लाईन काढण्याबाबत ची कार्यवाही त्वरित करावी व त्या सर्व लाईन अंडरग्राउंड करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तर लातूर शहराच्या राजीव गांधी चौक ते गरुड चौकातून जवळपास सहा किलोमीटरचा जो राष्ट्रीय महामार्ग जात आहे तो महामार्ग पिलर वरून करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा संकुल समिती मार्फत खेळाडूसाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कास गावडे यांनी क्रीडा विभागामार्फत मागील तीन वर्षात केलेल्या खर्चाची व विकास कामांची माहिती दिली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महापालिकेच्या पाच मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तसेच अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले सौरऊर्जा प्रकल्प त्वरित पूर्ण व्हावेत असेही त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गवसाने यांनी जिल्ह्यातील सुमारे तीनशे शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती दिली. तर महाबीज बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी ज्या ठिकाणी महाबीज बियाणे उगवण झालेले नाही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना तात्काळ दुसरे बियाणे बदलून देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी क्रीडा विभाग, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग, वीज वितरण कंपनी व कृषी विभाग या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या व दिलेल्या सूचनांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.