पत्रकारांनी केलेला सन्मान हा माझा नसून स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांचा आहे- उपमहापौर चंद्रकांत बिराजदार





पत्रकारांनी केलेला सन्मान हा माझा नसून स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांचा आहे- उपमहापौर चंद्रकांत बिराजदार

लातूर: गेले तीन चार महिन्यापासून महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी आपल्या नगराची सेवा करताना या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिवाचे रान करत आहेत आम्ही मात्र निमित्त आहोत,असे गौरव उद्गार लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आपल्या यांनी आपल्या कर्मचाऱ्याबद्दल व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले काम केले अशा व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आज लातूर महापालिकेच्या उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते.
सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण स्वतःहून आपल्या सहकाऱ्यांसह या महामारीचा विचार न करता रस्त्यावर उतरून चंद्रकांत बिराजदार यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्या हस्ते बिराजदार यांचा शाल, पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश पाठक यांचीही उपस्थिती होती. पत्रकार संघाचे महादेव डोंबे संघटक हे जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे, सचिव अशोक हनवते संघटक महादेव डोंबे, कोषाध्यक्ष अरुण कांबळे, सदस्य हरून मोमीन, अरुण हांडे,नितीन भाले, अमोल घायाळ आधीच पत्रकार बांधव उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव डोंबे यांनी तर अशोक हनवते यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या