भारतीय स्टेट बँक ग्रंथालयांसाठी बनली डोकेदुखी







भारतीय स्टेट बँक ग्रंथालयांसाठी बनली डोकेदुखी...
लातूर,दि.१५ः लातूर येथील भारतीय स्टेट बँक,चंद्रनगर मुख्य शाखा ही सार्वजनिक ग्रंथालयांसाठी एक डोकेदुखी बनली आहे. वार्षिक अहवाल, ऑडिटसाठी खात्याचे स्टेटमेंट मागणी केली,तर त्या अर्जावर इतरही पदाधिकार्‍यांच्या सह्याची तोंडी अट लावून कोरेानाच्या शारिरीक अंतर पाळायच्या व गर्दी कमी ठेवण्याच्या काळात अडवणूक केली जात आहे.
लातूर येथील भारतीय स्टेट बँकेत सार्वजनिक ग्रंथालयांची शेकडो करंट खाते आहेत. ग्रंथालयांना सहा महिने तर कधी नऊ महिन्याने शासनअनुदान मिळते.हे अनुदान उचलणेसाठी या बँकेत जाणे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ ग्रंथालय चालक,कर्मचार्‍यांवर येत आहे.अगोदरच मार्च अखेरचे ग्रंथालयांचे जे मिळायचे तुटपुंजे अनुदान तेही आलेले नाही.त्यात आता ३० जून  २०२०पर्यंत सार्वजनिक ग्रंथालयांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. हा  अहवाल बनविताना बँक खाते स्थिती,शिल्लक यांच्या नोंदीची बँक पासबुकावर नोंद आवश्यक असते.ती नोंद घेण्यासाठी या बँकेने बाहेरच्या बाजूने मनिन बसलेली आहे, या मशीनवर सातत्याने गर्दी तर असतेच शिवाय अधून मधून ती मशीन बंद पडते.काही वेळा  बँक पासबुकावर एंंट्री नीट येत नाही, आलीच तर  अर्धवट,कधी पासबुकच अडकणे आणि मग मुख्य कार्यालयात धाव घेवून बोंबलत राहायचे ते म्हणणार येतोय,थांबा थोडं अशी ही नेहमीची डोकेदुखी आहे.
त्यात आता एक नवीन त्रासाची भर पडली आहे. या बँकेतून पूर्र्वी ग्रंथालयाचे स्टेटमेंट काढण्यासाठी दोन वर्षापूर्वी तोंडी व कागदावर नंबर ठेवून गेल्यास पुन्हा स्टेटमेंट मिळालयचे,गवतर्षी  ग्रंथालय पदाधिकार्‍यांपैकी एकाच्या सहीने अर्ज करुन स्टेटमेंट दिले जायचे.आता एक तर कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या बँकेत एक मीटर अंतरावर थांबायचे,बराच वेळाने नंबर आला की मध्ये जावून सचिवाच्या सहीने स्टेटमेंट मागितले असता. संयुक्त खाते असल्याने इतर पदाधिकार्‍यांच्याही सह्याने अर्ज करा असे सांगितले जात आहे, एकतर गर्दी करायची नाही,वेळ सकाळी १० ते ४ लोकांच्या नेमक्या शासकीय,निमशासकीय कामाचा त्यात स्टेटमेंट वा इतर कामासाठी वेळ काढून जायचे तिथे आतले कर्मचारी असा अलिखीत नियम सांगून मोकळे होणार.. त्यामुळे एकतर लाईनला उभे राहून वेळ घालवायचा यांनी तोंडी नियम सांगायचा..असे एक ना अनेक वाईट प्रसंगी व कटकटी या भारतीय स्टेट बँकेत अनुभवाला येत आहेत,लहानसहान गोष्टीसाठी येथे अडवणूक केली जातेय.बँक शाखाधिकार्‍यांनी याबाबत दर्शनी भागात स्टेटमेंट संदर्भात सार्वजनिक ग्रंथालयांना अवगत करावे,अकारण भीक नको पण कुत्रा म्हणायची वेळ येवू देवू नये,अशी अपेक्षा ग्रंथालय चालकांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या