बाळूमामाच्या नावाने दरबार भरवून लोकांना लुबाडणार्‍या बबलू धनगर बुवाविरोधात मुरुड पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र जिल्हा अंनिसचा पाठपुरावा ठरला महत्वाचा





बाळूमामाच्या नावाने दरबार भरवून लोकांना लुबाडणार्‍या
 बबलू धनगर बुवाविरोधात मुरुड पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र जिल्हा अंनिसचा पाठपुरावा ठरला महत्वाचा..
लातूर,दि.१५ः बाळू मामाच्या नावाचा दरबार भरवून लोकांचे आर्थिक ,मानसिक व शारिरीक शोषण करणारा व करणी भानामती दुरुस्ती करतो  म्हणून समाजात तेढ निर्माण करुन,अंधश्रध्दा पसरवणार्‍या मुरुड येथील बबलूधनगर याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा ३(१) व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत वतयांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा ३(२) व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत वतयांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ ,प्रमाणे,गुरुन १२५/२०२० नूसार दि.१२ जून २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याकामी महाराष्ट्र अंनिस लातूर जिल्ह्याचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.
या भोंदुगिरीची अधिक माहिती अशी की, मुरुड येथील मधुकर पंढरी कुंभार यांनी दि.६ जून २०२० रोजी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली , त्यावरुन आमच्या गावातील बबलू धनगर याने मुरुड लातूर रोडवर माले पेट्रोल पंपाजवळ बाळू मामाचे मालकीचे मंदिर बाधंले असून, गेल्या दोन वर्षापासून तो बाळू मामाचा भक्त असल्याचे सांगून,मंदिरामध्ये दरबार भरवून,जादुटोणा, बुवाबाजीकरुन आमच्या समाज बांधवामध्ये तेढ निर्माण करतो,अंधश्रध्दा पसरवून लोकांची दिशाभूल करतो,शेजारी पाजार्‍यांंनी भानामती केली, म्हणून नावे सांगून, भांडण लावण्याचा प्रयत्न करतो,त्यामुळे समाजात माझ्याविषयी गैरसमज केला आहे अशा आशयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात  महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे,जिल्हाध्यक्ष ऍड.मनोहरराव गोमारे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर  व शहर कार्याध्यक्ष प्रा.दशरथ भिसे यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकंात, पोलीस अधीक्षक राजेंद्र मोरे,शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिनसांगळे यांची प्रत्यक्ष भेट घेवून यात तातडीने बबलू धनगर यांच्या विरोधात बुवाबाजी विरुध्द, जादुटोणा विरोधी,कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी याच दिवशी केली होती.त्यावर मुरुड पोलीस ठाण्यात दि.१२ जून २०२० रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा ३(१) व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत वतयांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा ३(२) व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत वतयांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या