भाजपा तालुका सचिव पदे गजेंद्र डोलारे गुरुजी...
औसा प्रतिनिधी /-औसा तालुक्यात भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना बांधणी मजबूत व्हावी म्हणून आ. अभिमन्यु पवार व तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी भाजपच्या तालुका सचिवपदी चिंचोली (सो) येथील सेवानिवृत्त क्रिडापटू शिक्षक गजेंद्र बळीराम डोलारे यांची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन, राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर, शिक्षक व क्रिडारत्न पुरस्काराचे मानकरी असलेले गजेंद्र डोलारे यांनी नेताजी विद्यालय शिंदाळा (लो) येथे 30 वर्ष ज्ञानार्जनाचे कार्य करून सेवानिवृत्त झाले आहेत.सेवानिवृत्तीनंतर भाजपचे तालुका सचिव म्हणून पूर्णवेळ राजकारणात सक्रिय झाले असून त्यांच्या निवडीबद्दल, सर्वश्री मुक्तेश्वर वाघदरे, अरविंद कुलकर्णी, सुशील बाजपाई, संतोष मुक्ता, सुनील उटगे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, युवा मोर्चाचे धनराज परसने यांनी अभिनंदन केले आहे. भाजपच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटना कार्य करीत राहू अशी ग्वाही यावेळी गजेंद्र डोलारे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.