पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीची जाण ठेवून राजकारण न करता अडचणीच्या काळात मनपा प्रशासनास सहकार्य करावे. - महापौर विक्रांत गोजमगुंडे
मनपा आयुक्तांनावरील सर्व आरोप बिनबुडाचे.
महापौर व आयुक्तांनी केली क्वॉरांटाईन सेंटर ची पाहणी. नागरिकांनी व्यक्त केले समाधान.
लातूर शहरांमध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तातडीने रुग्णांवर इलाज सुरू केले जात असून संबंधित भाग सील करून नागरिकांना सर्व प्रकारच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता घरबसल्या उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच बरोबर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शहरातील समाज कल्याण विभाग येथील विलगिकरण केंद्र येथे विलगीकरण करण्यात येते आहे. आज रोजी सुमारे ९५ व्यक्तींना या विलगीकरण केंद्र मध्ये ठेवण्यात आलेले असून त्यांना दोन वेळच्या जेवणासह नाष्टा व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
अपुऱ्या साधन संपत्ती व मनुष्यबळाचा तुटवडा असून देखील लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने केल्या जात आहेत आज महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त देविदास टेकाळे यांनी या विलगीकरण केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली यावेळी विलगीकरण केंद्र येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांनी येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
कोरोना विषाणूचा सामना करत असताना मनपा प्रशासन प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्तम कामगिरी बजावत आहे परंतु तरीही केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून पोकळ प्रसिद्धीसाठी स्थायी समिती सभापती यांच्या वतीने विलगीकरण केंद्र येथे सुविधा उपलब्ध नसल्याबाबत आयुक्तांना दोष देण्यात येत आहे. आज एका कोरोना बाधित व्यक्ती च्या परिवारातील सदस्यांचा चुकीचे छायाचित्र प्रकाशित करून मनपा प्रशासनावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. आज महापौर व आयुक्त यांनी विलगीकरण केंद्रास भेट दिली असतात त्याच परिवारास शी संवाद साधला असता त्या परिवारातील सदस्यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे स्थायी समिती सभापती यांनी आयुक्तांवर केलेल्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले असून महापौरांनी माहिती घेतली असता स्थायी समिती सभापती यांनी एकदाही विलगीकरण केंद्रास भेट दिली नसल्याचे समोर आले.
स्थायी समिती सभापती हे संवैधानिक पद असून स्थायी समिती मनपा कामकाजावर नियंत्रण ठेवणारी समिती आहे तरी पदाच्या जबाबदारीचे भान ठेवता आपत्ती काळात राजकारण न करता सर्व पदाधिकारी यांनी मनपा प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.
नूतन आयुक्त देविदास टेकाळे हे नुकतेच रुजू झाले असले तरी ते सर्व परिस्थिती गांभीर्यपूर्वक हाताळत आहेत अशा अडचणीच्या काळात सर्वांनी मनपा प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आपापल्या पद्धतीने अडचणीची सोडून कशी करता येईल याचा विचार करत लातूरकरांना या संकटातून बाहेर काढण्याकरिता योगदान देणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.