स्थायी यी समिती सभापती यांच्या "अर्थपूर्ण" कारभारामुळे लातूरकर वेठीस.
ब्लिचिंग पावडर अभावी पाणी शुध्दीकरण ६ तास बंद
अखेर जुन्या कंत्राटदाराकडून ब्लिचिंग दोन महिने पुरेल एवढा ब्लिचिंग पावडर साठा उपलब्ध.
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या भोंगळ कारभारामुळे लातूरकरांना वेठीस धरण्यात येत आहे. स्थायी समिती सभापती यांच्या अर्थपूर्ण कारभारामुळे लातूर शहर पाणीपुरवठा करिता लागणारे ब्लिचिंग पावडर चा तुटवडा निर्माण होऊन तब्बल सहा तास जलशुद्धीकरण प्रकल्प बंद राहिला. पाणीपुरवठा जलशुद्धीकरण करिता लागणाऱ्या ब्लिचिंग पावडर ची निविदा दिनांक २७ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आली होती तसेच सदर निविदा दिनांक १२ मे रोजी उघडण्यात येवून दिनांक २६ मे रोजी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेली होती परंतु स्थायी समितीमधील अर्थपूर्ण कारभारामुळे निविदा मंजुरी रडवून ठेवण्यात आली. मंजुरीचा ठराव मात्र दिनांक १५ जून रोजी प्रशासनास देण्यात आला.
दरम्यानच्या काळात नाईलाजाने मनपा प्रशासनास जुन्या कंत्राटदाराकडूनच ब्लिचिंग पावडर खरेदी करणे भाग पडले. दिनांक १६ जून रोजी हा साठा उपलब्ध होवुन पुढील दोन महिने पुरेल एवढा ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध करुन घेण्यात आलेला आहे. ब्लिचिंग पावडर संपत असल्याबाबतची मागणी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेळोवेळी नोंदविण्यात आलेली होती परंतु तरीही निविदा प्रक्रियेत मंजुरी देण्याकरिता जाणून-बुजून करण्यात आलेल्या विलंबामुळे ब्लिचिंग पावडर चा निर्माण झाला होता. अर्थपूर्ण कारणांमुळे अत्यावश्यक सेवा मध्ये खंड पडणे म्हणजे लातूरकरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे किमान यापुढे तरी अर्थपूर्ण व्यवहार बाजूला ठेवून स्थायी समिती द्वारे प्रशासनास आवश्यक त्या मंजूरी वेळीच दिल्या जाव्यात अशी आशा उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी व्यक्त केली
चौकट
मनपा आयुक्तांच्या काम उत्तम, अडचणीच्या काळात तरी प्रशासनास वेठीस ठरू नये - महापौर विक्रांत गोजमगुंडे
नव्याने रुजू झालेले मनपा आयुक्त देविदास टेकाळे हे अडचणीच्या काळात उत्तम कार्य करत असून महानगरपालिकेच्या सर्वच कामांना न्याय देण्याचे काम करीत आहेत परंतु स्वतःचे स्वार्थ जोपासणे करिता व त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याकरिता त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे योग्य नसून आणीबाणीच्या काळात तरी राजकारण न करता मनपा प्रशासनास सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.