खताचा तुटवडा होणार नाही; शेतकºयांनी चिंता करु नये आमदार धिरज देशमुख यांचे आवाहन






खताचा तुटवडा होणार नाही; शेतकºयांनी चिंता करु नये
आमदार धिरज देशमुख यांचे आवाहन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात मृगाचा पाऊस बºयापैकी बरसत आहे़ शेतकरी बांधव खरीप हंगामाच्या पेरण्यात गुंतले आहेत़ खते, बी-बियाणांची जुळवाजुळव केली जात आहे़ मात्र खताचा तुटवडा असल्याचे ऐकीवात येत आहे़ मात्र प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही़ मागणी प्रमाणे पुरवठा होईल, ईतक्याप्रमाणात खत उपलब्ध आहे़ त्यामुळे खताचा तुटवडा होणार नाही; शेतकºयांनी चिंता करु नये, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे़
शेतकºयांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. जिल्ह्यााचे या वर्षी खरिपामध्ये ५,६०,००० हे क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असून यामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक असून तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांची पेरणी केली जाते. यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट असले तरी शेतकरी बांधव उत्साहाचे खरीपाच्या पेरणीला लागला आहे़ बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव आता अंतीम टप्प्यात आहे़  लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मागणीप्रमाणे बी-बियाणे आणि खताची उपलब्धता करुन ठेवली आहे, असे असताना खतांच्या तुटवड्याच्या वावड्या सुटल्या आहेत़ वास्तविक परिस्थिती मात्र तशाी नाही़ मंगळवारीच खतांची उपलब्धता झाली आहे़ बुधवारीही खतांची आवक होणार आहे़ शेतकºयांना मागणीप्रमाणे बी-बियाणे व खते पुरवठा करण्यात येत आहे़  याउपरही आणखी खतांची गरज असेल तर तेही उपलब्ध करुन देण्यात येईल़ खताचा तुटवडा होणार नाही त्यामुळे शेतकºयांनी चिंता करु नये़ काही अडचण असल्यास लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे़ .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या