देवणी तालुक्यात अग्रो फॉरेस्ट्री व सोशल फॉरेस्ट्री प्रकल्पाअंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ.व "हर मेड पर पेड" अभियानाची सुरूवात







देवणी तालुक्यात अग्रो फॉरेस्ट्री व सोशल फॉरेस्ट्री प्रकल्पाअंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ.व   "हर मेड पर पेड" अभियानाची सुरूवात
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर हुमेन व्हॅल्यू व  फोक्सवॅगन  यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून देवणी तालुक्यातील आंबानगर, वडमुरंबी, इंद्राळ, लासोना या गावात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. 
देवणी तालुक्याचे तहसीलदार श्री सुरेशजी घोळवे यांच्या हस्ते इंद्रळ या गावी वृक्ष  लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी देवणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  व जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती श्री नागेशजी जिवणे, प्रकल्प संचालक महादेव गोमारे,  ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वयंसेवक कृष्णा नरवडे विशाल जाधव, अनिकेत जाधव   यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
या वर्षी देवणी तालुक्यातील आंबानगर, इंद्राळ वडमुरंबी व लासोना या गावात शेतकऱयांच्या शेतीमध्ये  बांधावर व सार्वजिनक ठिकाणी पंचवीस हजार फळझाडे व  बांबू इतर देशी वृक्षांची लागवडीस  सुरुवात झाली आहे.
"हर मेड पर पेड" या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी, मातीची धूप थांबवण्यासाठी, जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरण्यासाठी व तापमानातील बदलावर मात करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड ही सुरू केली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना जातिवंत केशर आंबा, जांभळ, आवळा, चिकू, पेरू आणि त्या भागात येणाऱ्या फळ झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येत आहे.
या वर्षी विशेष करून शेतकऱ्यांच्या पडिल जमिनी ओढ्याकाठाच्या जमिनी व शेतीच्या कुंपणाभोवती बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . जेणेकरून शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक उत्पन्न मिळेल व आपल्या भागातील शेती कामासाठी व बांधकाम कामासाठी लागणाऱ्या बांबूची गरज याच जिल्ह्यात पूर्ण करता येईल. या प्रकल्पाअंतर्गत या वर्षी जिल्ह्यात एक लाख बांबू रोपांची लागवड करण्यात येत आहे.
सोबतच शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व त्या भागात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी कोणती झाडे लागवड करावयाची  याचे मार्गदर्शनही या कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक श्री महादेव गोमारे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या