किनीनवरे गावाच्या पाणीटंचाईचा प्रश्न उच्च न्यायालयात
औसा प्रतिनिधी/
1993 च्या भूकंपा नंतर जवळपास 30 वर्षापासून किनिनवरे गावात तीव्र पाणीटंचाई होती,
दि, 03 /03/ 2019 रोजी गावचे प्रथम सरपंच स्व, संभाजीराव बळीराम भिसे यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी लातूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री यांचे समवेत जिल्ह्यातील नामवंत पदाधिकारी व अधिकारी गावात उपस्थित होते, हे औचित्य साधून गावकऱ्यांनी गावातील तीव्र पाणीटंचाईची समस्या मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर दि, 25/0 3/ 2019 रोजी गावची कायमची पाणीटंचाई दूर होण्यासाठी शेडोळ पाझर तलावात विहीर पाडून तेथून पाणीपुरवठा टाकीपर्यंत पाइपलाइन मंजूर करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने दिला, दि, 17/0 9 /2019 रोजी किनिनवरे ता, औसा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शेडोळ तालुका निलंगा येथील पाझर तलावात ( मग्रारोहयो अंतर्गत ) विहीर पाडून पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली, दि, 24/0 4/ 2020 रोजी पाणीपुरवठा सार्वजनिक विहीरी पासून जि, प शाळेच्या पाठीमागील टाकीपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी एक महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली, वेळोवेळी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी ,, गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांना वारंवार लेखी व तोंडी विनंती करून पाणीटंचाई सार्वजनिक विहीर व तेथून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईनचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले असताना देखील गावांमध्ये रोड ,गटार, रस्ते व शासकीय योजनेतील इतर कांही चालू होती, परंतु पाणीटंचाईच्या कामाकडे वरिष्ठांकडून आवश्यक दखल घेतली जात नसल्यामुळे माधव शंकर भिसे यांनी येथील तीव्र पाणी टंचाई बाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्यामुळे महाराष्ट्र शासन , जिल्हाधिकारी लातूर , मुख्य कार्यकारी अधिकारी जि प लातूर , मुख्य कार्यकारी अभियंता ग्रामीण पा,पू जि प लातूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती औसा , ग्रामसेवक किनिनवरे यांना या प्रकरणी नोटीस दिलेली असून दि,19 /06/ 2020 रोजी अंतिम सुनावणी ठेवलेली आहे, या मुळे ग्रामस्थ पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.