बेघर,विधवेला रेशनकार्ड देवून लातूर तहसीलनेे
शाहू महाराज जयंतीदिनी केला सामाजिक न्याय
लाभार्थी-कार्यकत्यार्र्ंनी प्रशासनाचे मानले आभार
लातूर,दि.२६ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांंचा २६ जून हा जयंती दिन अर्थात सामाजिक न्याय दिन, लातूर तहसील पुरवठा विभागाने पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक वर्षांखाली हरंगुळ बु.राजे नगरात विसावलेल्या एका बेघर,विधवेला रेशनकार्ड रुपी न्याय देत कृतीशिल अभिवादन करुन, शासन उपेक्षित जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची प्रतिची दिली.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेला कमलसिंग राजपूत यांचा परिवार हरंगुळ बु.च्या राजे नगरात पाल टाकून विसावला.काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, मग आडव्या तिडव्या लाकावर भोरगे टाकून आपल्या तीन मुले व एका मुलींसह विधवा हजारीबाई आला दिवस काढत राहिल्या.लॉकडाऊनच्या काळात भाजपा नेते व्यंकट पनाळे यांना त्यांंची आबाळ लक्षात आली,तिच्याकडे आधार वा इतर कसलाही पुरावा नाही, त्यावर त्यांनी व्हिडीओ बनविला होता.तो पाहून पत्रकार बाळ होळीकर यांनी तिला रेशनकार्ड मिळवून देण्याचा निश्चय केला होता,याबाबत लातूर तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांंच्याशी चर्चा केली.गुरुवारी सायंकाळी त्यांनी नितीन चालक व गणेश सगर यांच्यासमवेत राजे नगरातील हजारीबाईच्या पालाचा शोध घेवून, त्यांना उद्या रेशनकार्ड मिळवून देवू असे सांगून परतले अन् ना.त.सुधीर देशमुख यांची भेट घेवून याबाबतअवगत केले.तिची एकूण गंभीर,बिकट परिस्थिती सहानुभूतीपूर्वक लक्षात घेवून त्यांनी,त्या महिलेला उद्याच रेशनकार्ड देण्याचा शब्द दिला.त्याप्रमाणे शुक्रवार,दि.२६ जून २०२० रोजी लोकराजा शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून,शारिरीक अंतर राखून,तहसील कार्यालयात, वरिष्ठ नायब तहसीलदार राजेश जाधव,ना.त.सुधीर देशमुख,अव्व्ल कारकून गणेश अंबर, भाजपा नेते व्यंकट पनाळे यांंच्या, हस्ते त्या बेघर,विधवेला केशरी शिधापत्रिका प्रदान करुन,तिला प्रधानमंत्री अन्न यांजनेचा लाभ देवू असे सांगत खर्या अर्थाने सामाजिक न्याय दिनाचा प्रत्यय आणून दिला,प्रथमच शिधापत्रिका पाहून त्या सद्गदीत व कृतज्ञ झाल्या.
यावेळी पुरवठाचे लिपिक विठ्ठल काळे,पत्रकार ईस्माइल शेख, बाळ होळीकर,जयेश जगताप,कृष्णा जटाळ, कोतवाल रशीद पटेल,नितीन चालक, ज्ञानोबा कांबळे,निराशादेवी ठाकूर आदींची उपस्थिती होती.सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने लातूर तहसील प्रशासनाने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल लाभार्थी व कार्यकत्यार्ंंनी आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.