औशाच्या औद्योगिक विकासासाठी आ.अभिमन्यू पवार यांची आढावा बैठक..





औशाच्या औद्योगिक विकासासाठी आ.अभिमन्यू पवार यांची आढावा बैठक.. 



बैठकीत उद्योजकांची उत्स्फूर्त सहभाग. 

औसा - प्रतिनिधी (ईलयास चौधरी) औशाच्या औद्योगिक विकासातून उद्योगाला उभारी मिळावी यातून नवीन उद्योग व तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा उद्योजकांना नवीन उद्योग उभारणीसाठी संधी याठिकाणी निर्माण 
व्हावी.यासाठी शासन स्तरावर काय उपाययोजना करता येतील यासाठी उद्योगांना असलेल्या समस्यांचा व औद्योगिक क्षेत्र वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा बैठक दि. २५ जून रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योजक यांची औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वत:हा पुढाकार घेत घेतली.  
   औसा एमआयडीसी येथे पार पडलेल्या या आढावा बैठकीत असुरळीत वीजपुरवठ्याबद्दल आणि कमी पाणीपुरवठ्याबद्दल या बैठकीत तक्रारी मांडण्यात आल्या. तांत्रिक अडचणी कायमच्या दूर करून अखंडित वीजपुरवठा करण्याच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपुरवठ्यावर जिल्हाधिकारी  जी श्रीकांत यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे काही निर्बंध लागू केले आहेत पण पाण्याची उपलब्धता वाढल्यानंतर मात्र मुबलक पाणीपुरवठा नियमितपणे करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांनाही आ. पवार यांनी दिल्या.औसा एमआयडीसी येथे नवीन उद्योगांना जागा कमी पडत असल्याने टेंभी येथे जागा संपादित करून एमआयडीसी निर्माण करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.या बैठकीला उपविभागीय अधिकारी  अविनाश कांबळे,एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड.श्रीकांत सुर्यवंशी,एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी  मेघमाळे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते संजय कौसडीकर, डीआयसी चे जनरल मॅनेजर हनभर,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, नायब तहसीलदार वृषाली केसकर, महावितरण चे उपविभागीय अभियंते दुधाळे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व औसातील सर्व प्रमुख उद्योजक उपस्थित होते.

_________________________________________


 आ.अभिमन्यू पवार यांचा बैठकीतील उत्साह, मुद्यांची हाताळणी पाहून एमआयडीसीतील सर्व उद्योजकांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला आहे. मी आणि आ.अभिमन्यू पवार, आम्ही खरं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पण पक्षीय अभिनिवेश कुठेही आडवा आला नाही.आमदार स्वतः असा पुढाकार घेत असतील तर आम्ही सर्व उद्योजक पक्षीय व वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवून औसा शहराच्या औद्योगिक विकासासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावू.असे मत औसा एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या