जिल्हा न्यायालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन






जिल्हा न्यायालयात राजर्षी
शाहू महाराज यांना अभिवादन

लातूर ( दि. २६.०६ २०२०):
लातूर जिल्हा वकील मंडळ तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज २६ जून रोजी जाणता राजा राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.या छोटेखानी जयंती समारंभाला वकील मंडळाचे विद्यमान अध्यक्ष ड. चंद्रकांत आगरकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सदस्य ड. संजय कांबळे , ड. राजेंद्र लातूरकर ड. गायत्री नल्ले, ड. शिवकुमार बनसोडे , लातूर जिल्हा वकील मंडळाचे  अध्यक्ष ड. चंद्रकांतआगरकर ,ड. भाई उदय गवारे, दत्ता गर्जे,ड. प्रदीपसिंह गंगणे,ड. सचिन बावगे व ड.सलीम डावकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        कार्यक्रमारंभी ड. चंद्रकांत आगरकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यथोचित अभिवादन करण्यात आले .
          या प्रसंगी सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याचे भान राखून राजर्षी शाहू यांच्या जीवनकार्याचा चर्चेच्या माध्यमातून सविस्तर परामर्श घेण्यातआला.राजर्षींची राज्यकारभारातील पारदर्शकता,शिक्षण  , समाजसुधारणा ,विद्यार्थी वसतिगृहे ,मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तथा ५० टक्के आरक्षण , अस्पृश्यता निवारण ,उद्योगांना चालना व अर्थसाहाय्य ,कला व कलाकारांना राजाश्रय,आंतरजातीय विवाह , पुनर्विवाह आदी विषयांत त्यांनी सुघारणेबरोबरच कायदे तयार करून त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली. शेतकरी व फासेपारध्यांना त्यांनी मानसन्मान दिला .मल्लविद्येत तरबेज़ असणा-या मल्लांना त्यांनी सुविधेसह उत्तेजनही दिले .राजर्षींनी आपल्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या जीवनकालात वरील क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्यामुळे तत्कालीन समाजाने आधुनिकतेकडे
मार्गक्रमण केले , अशी गौरवपूर्ण मते या चर्चेत मांडण्यात आली .या चर्चेत ड. राजेंद्र लातूरकर, ड. शिवकुमार बनसोडे,ड. चंद्रकांत आगरकर तथा ड. उदय गवारे यांचा प्रमुख व क्रियाशील सहभाग होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या