योग शास्त्र ही भारताने संपूर्ण जगाला व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे.
ज्यात फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे तर बौध्दिक,भावनिक,सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाची किल्ली आहे. शरीर-मनाची, विचार-कृतीची, संयम-समाधानाची व मानव-निसर्गाची एकसंघता , एकात्मता आणि आपल्या आयुष्याचे पूर्णत्व हे योगशास्त्राच्या अभ्यासाने व नियमित सरावाने साध्य होते. आज सर्वत्र सर्वसाधारणपणे योगाचे शारीरिक अंग “ आसन” जास्त प्रचलित आहे. परंतू योगाचे व्यायामापलीकडील योगदान अमाप आहे. अशा सागरासारख्या विशाल, 5000 वर्षाचा वारसा असलेल्या शास्त्राला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे International Day Of Yoga आंतरराष्ट्रीय योगदिवसाचे यावर्षीचे सहावे वर्ष आहे. योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.
या दिवसाचे विशेष महत्व असे की तो दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. या काळात सर्व जीवांना जगवणारी सौरऊर्जा सर्वाधिक प्रभावशाली असते या ऊर्जेतून सकारात्मकता आणि आत्मविकास वृंध्दिगत व्हावा यासाठी योग दिवसाचे प्रयोजन.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.