*ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे* ? या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा








*ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे* ? या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा 
सध्या सुरु असलेल्या परिस्थितीत शाळा कधी सुरु होणार आहेत ? या वर्षी दहावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास कसा करून घ्यायचा ? शाळेतील शिक्षण कसे असणार आहे ? आपल्या मुलांचे शिक्षण नक्की कसे होणार आहे ? मुलांची सुरक्षितता आणि मुलांचे शिक्षण यांचा समन्वय कसा साधायचा ? आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि पर्यायाने या वर्षाच्या मार्कांवर काय परिणाम होणार आहे ? ऑनलाईन शिक्षणात मुलांचा अभ्यास नक्की कसा करून घ्यायचा ? ऑनलाईन शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ? त्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे ? असे अनेक प्रश्न आता संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत.
या सर्व प्रश्नांवर फक्त चर्चा न करता याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. औसा तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी *शनिवारी दिनांक 20 -6 -2020 रोजी सकाळी* 11=००वाजता ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कंप्युटर आणि मोबाईलद्वारे शिक्षण देण्याचा ३० वर्षांचा अनुभव असलेल्या लातूर येथील ‘सिनर्जी इन्फोटेक’ चे समन्वयक आणि *एमके सीएलचे विभागीय समन्वयक* *श्री. महेश पत्रिके सर* या कार्यशाळेला संबोधित करणार आहेत. साधारणपणे दोन तास चालणाऱ्या या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आमच्याशी 9960613601, 9423348680, 9860327696, 9960956000, 9423348849, 9595105013 ,8208555067,9730366032,9764664396,9527176363,9021670000,9921852573,8329915683,9850028917या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीची संपूर्ण प्रोसेस आपल्याला सांगता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या