कन्हेरगांव नाका कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त




कन्हेरगांव नाका कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त
 
हिंगोली,दि.29: हिंगोली तालुक्यातील मौ. कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र. 2 येथे कोविड-19 चा रुग्ण आढळून आला होता. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.परंतू मौ. कन्हेरगांव नाका येथील रुग्ण हा बरा झाला असून कन्हेरगाव नाका येथील वार्ड क्र. 2 हे क्षेत्र वगळता सर्व गांव कंटेन्मेंट झोन मुक्त करणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात सदर क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
त्यानुसार मौ. कन्हेरगांव नाका येथील वार्ड क्र.2 चा कंटेनमेंट झोनचा कालावधी संपला असल्याने वार्ड क्र. 2 हे क्षेत्र वगळता इतर परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्र प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी  प्रतिबंधमुक्त करण्यात 
आल्याचे आदेश काढले आहेत.
****
                                                     
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी गौकर्ण देवीची यात्रा रद्द 
 
हिंगोली, दि.29: जिल्ह्यातील गौकर्ण देवीची दि. 1 जुलै, 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गोकर्णा माळावरील मंदीरावर यात्रा भरणार असून त्या ठिकाणी जाण्यासाठी वगरवाडी, नागेशवाडी, दरेगाव, औंढा नागनाथ, जिंतूर फाटा येथून भाविक पायी जातात व मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी कालावधीत या सर्व उत्सवात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष, अबाल, वृध्द, भाविक येत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आजारावर अद्यापपर्यंत कुठलाही प्रतिबंधक उपाय किंवा लस उपलब्ध झाली नसल्याने गौकर्ण देवीच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, तसेच साथ रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता उत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. तसेच या पुढील कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक जमा होणारे धार्मिक कार्यक्रम मेळावे, यात्रा, महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये गौकर्ण देवीची दि. 1 जुलै, 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी यात्रा रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या