आज दि.२९ जुन २०२० रोजी मा.आयुक्त यांचे आदेशानुसार नंदी स्टॉप व अंबेजोगाई रोड या भागात महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने मास्क न वापरणा-या व्यक्तींवर तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणा-या आस्थापना विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ५२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली व एकूण रु.३९९००/- दंड वसूल करण्यात आला. या कार्यवाहीमध्ये उपायुक्त सौ.वसूधा फड, पोलीस निरिक्षक श्री नानासाहेब लाकाल,क्षेत्र अधिकारी श्री संजय कुलकर्णी, श्री बंडू किसवे, श्री रवि कांबळे, शिवाजी कुटकर, डी.एस.सोनवणे, बाळासाहेब गिते, गणेश शिंदे, बालाजी झोडपे, गोविंद चामे यांनी सहभाग घेतला.
उपायुक्त
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.