औशातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापा-यांचा आडत बाजार पांच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
औसा=मुख्तार मणियार
औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापा-यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आडत व्यापा-यांची रविवारी एक बैठक झाली त्या बैठकीत औसा शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ठराविक व्यवहारांना मुभा दिल्याने बाजारपेठेसह अन्यत्र नागरिकांची वर्दळ वाढली आहे.दरम्यान काही नागरिक फिजिकल डिस्टन्स राखत नाहीत.औसा शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यानी स्वत:सह शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पांच दिवस आडत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी सोमवार रोजी सुरू करण्यात आली, त्यामुळे सोमवारी दिवसभर आडत व्यापार बंद होता.या निर्णयामुळे शेतक-यांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे, परंतु स्वत:हा बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी सर्वानुमते हा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष मदनलाल झंवर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.