व्यापारी जादा दराने ‍बियाणे विक्री करत असतील तर कृषि विभागाशी संपर्क साधावा






व्यापारी जादा दराने  ‍बियाणे विक्री
करत असतील तर कृषि विभागाशी संपर्क साधावा
लातूर,दि.15:-जिल्हयातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. जिल्हयाचे या वर्षी खरिपामध्ये 5,60,000 हे क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असून यामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक असून तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांची पेरणी केली जाते. यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अधिकृत दुकानदारांकडूनच खरेदी करावीत. दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे व बियाणाचे बिल, पिशवीवर लेबल जपून ठेवावे. एम.आर.पी. पेक्षा जादा दराने विक्री करत असेल तर लगेच कृषि विभागाशी संपर्क साधावा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खते खरेदी करताना शेतकरी गटामार्फत बाजारातून निविष्ठा खरेदी कराव्यात त्यामुळे बाजारांमधील गर्दी कमी होईल आणि शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील वाचणार आहेत शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणीस सुरुवात करावी. पेरणीपूर्वीक्‍ बियाणास बुरशीनाशक व जैविक संघाची बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. सोयाबीन तूर, मूग व उडीद या पिकांची बीबीएफ पेरणी यंत्राव्दारे पेरणी  करावी. बीबीऊ वर पेरणी केल्यास पाऊस कमी झाल्यास किंवा जास्त झाल्यावर ही फायदा होतो.
सोयाबीन पिकाबाबतित शेतकऱ्यांनी घरचे योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवणशक्ती तपासावी. उगवणशक्ती 70 टक्के आल्यास एकरी  30 किलो बियाणे पेरावे व उगवणशक्ती 69 टक्के आल्यास एकरी 35 किलो बियाणे पेरावे 60 पेक्षा कमी आल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरु नये त्याचबरोबर बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या