बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.गोपीचंद पडळकर याचा औसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध






बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.गोपीचंद पडळकर याचा औसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध
औसा=मुख्तार मणियार
राष्ट्रवादीचे काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनुद्गार काढल्याबद्दल औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालय समोर दिनांक 25 जुन 2020 गुरुवार रोजी त्यांच्या प्रतिमेला चपला मारुन घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर ग्रामिणचे अध्यक्ष डॉ अफसर शेख  म्हणाले, पद्मभूषण माननीय शरद पवार यांच्या बद्दल या भोप्याने जे उदगार काढलेले आहेत.पवार साहेबांचे राजकारणाचे जेवळे काम आहे तेवढे त्याचे वय सुस्था नाही आणि या बिंदूला कळायला पाहिजे होतं की आपण काय बोलतो आहे असे वक्तव्य करून भाजपला काय सिध्द करायचे आहे या वक्तव्या बद्दल भाजपच आहे . यांच्या पाठीशी माजी मुख्यमंत्रीच आहे असे म्हणाले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ अफसर शेख, श्रीकांत सुर्यवंशी,गोवींद जाधव,भरत सुर्यवंशी, वकील इनामदार,कृष्णा सावळकर,बासीद शेख,आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या