*लातूर शहरातील बाबा नगर, खाडगाव रोड, कंटेनमेंट झोन परिसरात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भेट* कोवीड१९ प्रादुर्भाव वाढू देऊ नये, जनतेला सोयीसुवीधा पुरविण्याचे निर्देश






*लातूर शहरातील बाबा नगर, खाडगाव रोड, कंटेनमेंट झोन परिसरात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भेट* 

कोवीड१९ प्रादुर्भाव वाढू देऊ नये,

जनतेला सोयीसुवीधा पुरविण्याचे निर्देश

 

लातूर प्रतिनिधी: (दि. १२ जुन) :

   लातूर श्हरातील बाबा नगर, खाडगावरोड कंटेनमेंट झोन परीसरात शनिवारी रोजी भेट देऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. या कंटेनमेंट झोन मध्ये कोवीड१९ चा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता सर्व प्रकारची काळजी घ्यावी, जनतेची गैरसोय होवु नये म्हणून त्यांना सर्व सोयीसुवीधा पुरविण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

   राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शनिवारी दि. १३ जून रोजी दुपारी बाबा नगर, खाडगाव रोड कंटेनमेंट झोन परिसराला भेट दिली. येथील नागरिकांशी चर्चा करून धीर दिला, काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगून दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या, तेथे उपस्थित अधिकारीसह सर्वांना याठिकाणी कंटेनमेंट झोनच्या सर्व नियमांचे पालन करावे असे निर्देश दिले आहेत.

   यावेळी आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषधाच्या गोळ्याचे वितरण कंटेनमेंट झोनमधील नागरिक, तेथे कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, मनपा स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना करण्यात आले. बाबा नगर, खाडगावरोड कंटेनमेंट झोन परीसरासातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांना जीवनाश्यक लागणारे साहित्य मिळणे बाबत काळजी घेण्याच्या सुचना मनपा प्रशासनास त्यांनी दिल्या आहेत.

   लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त हर्षल गायकवाड, डॉ. प्रशात माले, डॉ. रवी पुरी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, उपअभियंता एस.एन.काझी, बोंदर, दत्ता सोमवंशी, आयुब मणियार, पप्पू देशमुख, नागसेन कानेगावकर, सचिन गंगावणे, डॉ. एस.बी. कदम, प्रशांत महाले, एम.बी.फिस्के आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या